Skip to content

Cave बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.”

  2. एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला,

  3. “नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.”

  4. अब्राहामाने त्या देशातील लोकांना पुन्हा लवून मुजरा केला

  5. आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे ऐका, मला ती जागा तुझ्याकडून विकत घेऊ दे; त्या शेताची सर्व किंमत मी तुला देईन. मग मी माझ्या मृताला तिथे मूठमाती देईन.”

  6. हे ऐकून एफ्रोन अब्राहामाला म्हणाला,

  7. “महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.”

  8. तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्‍यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.

  9. अशाप्रकारे मम्रेजवळील मकपेला येथे असलेले एफ्रोनाचे शेत आणि शेताच्या शेवटच्या टोकाला असलेली गुहा आणि त्याच्या चतुःसीमातील प्रत्येक झाड अब्राहामाने विकत घेण्याचा करार केला.

  10. हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले.

  11. त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी साराह हिला कनान देशात मम्रे (म्हणजे हेब्रोन) जवळ असलेल्या मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.

  12. याप्रमाणे, हेथी लोकांनी स्मशानभूमी म्हणून शेत व त्यातील गुहा अब्राहामाच्या मालकीची झाल्याचा करार केला.

  13. नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या.

  14. कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.

  15. तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली.

  16. ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.”

  17. तेव्हा ते पाच राजे पळून गेले व मक्केदा येथे गुहेत लपून बसले.

  18. ते पाच राजे मक्केदा येथील एका गुहेत लपलेले आहेत हे जेव्हा यहोशुआला कळविण्यात आले,

  19. तेव्हा यहोशुआ म्हणाला, “मोठे धोंडे गुहेच्या तोंडावर लोटा आणि त्याचे राखण करावयाला काही माणसांना तिथे बसवा.

  20. पण थांबू नका; शत्रूचा पाठलाग चालू ठेवा! त्यांच्यावर मागून हल्ला करा आणि त्यांना त्यांच्या शहरांकडे जाऊ देऊ नका, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या हातात दिले आहे.”

  21. तेव्हा यहोशुआ आणि इस्राएली सैन्याने त्यांचा पूर्ण पराभव केला, परंतु त्यातून काही लोक वाचले व त्यांच्या तटबंदीच्या शहरात गेले.

  22. मग संपूर्ण इस्राएली सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशुआकडे सुरक्षित परतले. त्यानंतर इस्राएलविरुद्ध कोणीही एकही शब्द उच्चारला नाही.

  23. यहोशुआने म्हटले, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना माझ्याकडे बाहेर आणा.”

  24. मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले.

  25. जेव्हा त्या पाच राजांना बाहेर काढून यहोशुआ पुढे हजर करण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली पुरुषांना बोलाविले. मग त्याच्यासोबत आलेल्या सेनेच्या अधिकार्‍यांना तो म्हणाला, “इकडे या व आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवा.” तेव्हा ते पुढे आले आणि त्यांनी आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवले.