मुख्य मजकुरावर जा

Answers To Prayer बद्दल बायबलमधील वचने

195 वचने · 85 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले; तुम्ही माझे तारण झाला आहात.

  2. जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले; मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.

  3. जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.

  4. त्यांचे भय बाळगणार्‍यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात; त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात:

  5. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  6. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  7. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,

  8. जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.

  9. जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात.

  10. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  11. इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील.

  12. यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.

  13. जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल.

  14. “गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण पाणी कुठेही नाही; तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे. पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.

  15. मग तुम्ही हाक माराल आणि याहवेह त्यास उत्तर देतील; तुम्ही मदतीसाठी धावा कराल व ते म्हणतील: हा मी येथे आहे. “जर तुम्ही पीडितांना जोखडातून मुक्त कराल, एखाद्याकडे बोट रोखून आरोप लादण्याचे आणि द्वेषयुक्त बोलणे थांबवाल,

  16. परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे; तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही.

  17. कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते.

  18. मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन.

  19. म्हणून याहवेह असे म्हणाले: ‘मी त्यांच्यावर घोर आपत्ती घेऊन येणार त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ते रडून दयेसाठी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.

  20. यहूदीयातील नगर आणि यरुशलेममधील लोकांनी ज्या अन्य देवतांसमोर धूप जाळला, ते त्यांचा धावा करतील, परंतु त्यांना ते आपत्तीतून सोडवू शकणार नाही. निराशेच्या आपत्तीतून त्यांना सोडवू शकणार नाही.

  21. हे यहूदीया, जेवढी तुमची शहरे आहेत तेवढीच त्या दैवतांची संख्या; आणि तुमच्या या लाजिरवाण्या दैवतांच्या वेद्या, बआलापुढे धूप जाळण्याच्या वेद्या यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावर आहेत.’

  22. “म्हणून हे यिर्मयाह, इतःपर या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी रडू नकोस अथवा विनवण्याही करू नकोस; कारण अखेरीस निराशेने व्याकूळ होऊन ते माझ्यापुढे पदर पसरतील. परंतु मी त्यांचे ऐकणार नाही.

  23. यावर याहवेहने या लोकांबद्दल असे म्हटले: “माझ्यापासून दूर भटकणे त्यांना फार आवडते; ते त्यांची पावले ताब्यात ठेवत नाहीत. म्हणून याहवेह तुमचा स्वीकार करीत नाहीत; आता मी तुमची दुष्कर्मे आठवेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला शासन करेन.”

  24. जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.”

  25. मग तुम्ही माझ्याकडे याल व माझी प्रार्थना कराल, तेव्हा त्या मी ऐकेन.