मुख्य मजकुरावर जा

Zadok

40 वचने · 2 कुटुंब सदस्य

Zadok चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमाज.

  2. सादोक हा तरुण असून मोठा धैर्यवान लढवय्या होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या पित्याच्या घराण्यातील 22 सरदार होते;

  3. नंतर दावीदाने सादोक व अबीयाथार या मुख्य याजकांना व उरीएल, असायाह, योएल, शमायाह, एलीएल व अम्मीनादाब या लेवी पुढार्‍यांना बोलाविणे पाठविले.

  4. दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले.

  5. अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख याजक; शावेशा राजाचा चिटणीस होता.

  6. दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली.

  7. लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.

  8. अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.

  9. लेवी गोत्रावर: कमुवेलाचा पुत्र हशब्याह; अहरोन गोत्रावर: सादोक;

  10. त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्‍यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला.

  11. आणि सादोकच्या घराण्यातील अजर्‍याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.”

  12. आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.”

  13. सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  14. “ ‘परंतु लेवी गोत्रातील याजक जे सादोकचे वंशज आहेत, इस्राएली लोक माझ्यापासून बहकून गेले होते, तेव्हा ज्यांनी माझ्या पवित्रस्थानाची राखण केली, ते माझ्यासमोर सेवा करण्यास जवळ येतील; चरबी व रक्ताची यज्ञे अर्पिण्यासाठी ते माझ्यासमोर उभे राहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  15. सादोकाच्या संतानातील पवित्र केलेले याजक, जे माझी सेवा करण्यात विश्वासू होते आणि जेव्हा इस्राएली लोक बहकून गेले, तेव्हा जसे लेवी लोक बहकले, तसे ते बहकले नाही.