मुख्य मजकुरावर जा

Paul

179 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Saul, Mercurius

Paul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते तिथे अनेक दिवस वास्तव्य करीत असल्यामुळे, फेस्ताला राजाबरोबर पौलाच्या प्रकरणाची चर्चा करण्यास वेळ मिळाला. तो म्हणाला: “फेलिक्साने ज्याला कैदेत तसेच ठेवले होते असा एक मनुष्य येथे आहे.

  2. ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते. पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे.

  3. परंतु पौलाने कैसराकडे न्याय मागितला, तेव्हा मी त्याला बादशहाकडे नेण्याची व्यवस्था होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा हुकूम दिला.”

  4. तेव्हा दुसर्‍या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले.

  5. अग्रिप्पा राजा पौलास म्हणाला, “तुला स्वतःविषयी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे.” तेव्हा पौलाने आपल्या हाताने खूण करून बचावाचे भाषण करण्यास सुरुवात केली:

  6. आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, तेव्हा अरामी भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली. ‘शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? पराणीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.’

  7. हे ऐकताच फेस्त मध्येच म्हणाला, “पौला, तुझे मन ठिकाण्यावर नाही. तुझ्या दीर्घकाळाच्या अभ्यासाने तुझे मन भ्रमिष्ट झाले आहे.”

  8. अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?”

  9. पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.”

  10. आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले.

  11. दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्‍यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील.

  12. बराच वेळ व्यर्थ गेलेला होता आणि समुद्रावरून जाणे धोक्याचे झाले होते आणि आता प्रायश्चित्ताचा दिवस होऊन गेला होता. तेव्हा पौलाने अधिकार्‍यांना इशारा दिला,

  13. परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला स्वीकारला.

  14. अनेक दिवस कोणी काहीही खाल्ले नव्हते, मग शेवटी पौल उभा राहून त्यांना म्हणाला: “माणसांनो, तुम्ही माझा सल्ला ऐकून क्रेता बंदर सोडले नसते, तर हे नुकसान व हानी टळू शकली असती.

  15. आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्‍या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’

  16. परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.”

  17. पहाट होण्यापूर्वी पौलाने प्रत्येकाला अन्न खाण्यासाठी विनंती केली. तो म्हणाला, “आज चौदा दिवसापासून, अनिश्चित अशा मनःस्थितीत तुम्ही उपाशी राहिला आहात, काहीही खाल्ले नाही.

  18. परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे.

  19. तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला.

  20. त्याचे वडील बिछान्यावर तापाने व जुलाबाने आजारी होते. पौल त्याला पाहावयास गेला आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचे हात त्याच्यावर ठेऊन त्याला बरे केले.

  21. तेथील बंधुजनांनी आम्ही येणार असे ऐकले आणि ते प्रवास करून अप्पियाची पेठ व तीन उतार शाळा या ठिकाणी आम्हाला येऊन भेटले. त्यांना पाहून पौलाने परमेश्वराचे आभार मानले आणि त्याला प्रोत्साहन प्राप्त झाले.

  22. पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे.

  23. तीन दिवसानंतर पौलाने स्थानिक यहूदी पुढार्‍यांना एकत्र बोलाविले. ते आल्यावर तो म्हणाला: “माझ्या बंधूंनो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या पूर्वजांच्या रूढींचे उल्लंघन केलेले नाही, तरी यरुशलेममध्ये मला बंदिवान करून रोमी सरकारच्या हवाली केले.

  24. त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे:

  25. पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तिथेच त्याला भेटण्यास येणार्‍यांचे तो स्वागत करीत असे.