मुख्य मजकुरावर जा

Paul

179 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Saul, Mercurius

Paul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले.

  2. पौलाने केलेले कृत्य पाहून जमाव लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “परमेश्वर आमच्यामध्ये मनुष्य रूपाने उतरून आले आहेत!”

  3. बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले.

  4. परंतु ज्यावेळी प्रेषित बर्णबा व पौल यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी स्वतःची वस्त्रे फाडली व धावत लोकांमध्ये शिरून ते ओरडून म्हणाले:

  5. तेव्हा काही यहूदी अंत्युखिया आणि इकुन्या येथून आले आणि त्यांनी समुदायाला त्यांच्या बाजूने करवून घेतले. त्यांनी पौलाला धोंडमार केला आणि तो मरण पावला आहे असे समजून त्याला शहराबाहेर फरफटत ओढून नेले.

  6. पौल आणि बर्णबाचा त्यांच्याबरोबर प्रखर मतभेद व वादविवाद झाला. शेवटी पौल आणि बर्णबाबरोबर इतर काही विश्वासणार्‍यांची नेमणूक करण्यात आली व या प्रश्नांसंबंधी यरुशलेम येथे प्रेषित व वडीलजनांना भेटावे म्हणून त्यांना पाठविण्यात आले.

  7. तेव्हा बर्णबा व पौल यांच्याद्वारे गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराने जी चिन्हे व अद्भुते केली यांचे वर्णन ऐकत असताना सर्व सभा स्तब्ध राहिली.

  8. मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्‍यामधील पुढारी होते.

  9. तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे.

  10. पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली.

  11. काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्‍यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी.”

  12. परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती.

  13. परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्‍यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले.

  14. त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते.

  15. रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.”

  16. त्या ऐकणार्‍या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले.

  17. ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.”

  18. असे ती पुष्कळ दिवस करत होती. शेवटी पौल अत्यंत त्रस्त झाला आणि तिच्याकडे वळून तिच्यातील आत्म्याला म्हणाला, “मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा करतो की तिच्यातून बाहेर नीघ!” आणि त्या क्षणी तो आत्मा तिच्यातून निघून गेला.

  19. आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.

  20. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते.

  21. परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!”

  22. तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला.

  23. तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.”

  24. परंतु पौल अधिकार्‍यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.”

  25. आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला,