मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मोशे व त्याचा मदतनीस यहोशुआ उठले आणि मोशे पर्वतावर परमेश्वराकडे गेला.

  2. जेव्हा मोशे पर्वतावर गेला, मेघांनी पर्वत झाकून गेले,

  3. आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.

  4. मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.

  5. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  6. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  7. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  8. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  9. मग याहवेह मोशेला म्हणाले, “गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा व शुद्ध ऊद हे सुगंधी मसाले घे, हे सर्व समान प्रमाणात असावे,

  10. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  11. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  12. जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या.

  13. मोशेला पर्वतावरून खाली येण्यास उशीर होत आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोना सभोवती गोळा झाले व म्हणाले, “ये, आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.”

  14. मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत.

  15. याहवेह मोशेला पुन्हा म्हणाले, “मी या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत.

  16. पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?

  17. मग मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर दोन्ही बाजूंनी, मागे व पुढे लेख कोरलेले होते.

  18. जेव्हा यहोशुआने लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकला, तो मोशेला म्हणाला, “छावणीत युद्धाचा आवाज आहे.”

  19. मग मोशे अहरोनाला म्हणाला, “या लोकांनी तुला काय केले, म्हणून तू त्यांना एवढ्या मोठ्या पापात आणले?”

  20. ते मला म्हणाले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.’

  21. मोशेने पाहिले की, लोक मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्या शत्रूंसमोर एक चेष्टेचे कारण बनावे असे अहरोनाने त्यांना मोकळे सोडले आहे.

  22. म्हणून मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला व म्हणाला, “जे कोणी याहवेहच्या पक्षाचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवीचे सर्व लोक त्याच्याकडे आले.

  23. मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे लेवीच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अंदाजे तीन हजार लोक मरण पावले.

  24. तेव्हा मोशे म्हणाला, “आज तुम्ही याहवेहसाठी वेगळे केले गेले आहात आणि याहवेहने आज तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, कारण तुम्ही आपले पुत्र, भाऊ यांच्याविरुद्ध गेलात.”

  25. मग दुसर्‍या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही मोठे पाप केले आहे, पण आता मी वर याहवेहकडे जाईन; कदाचित मी तुमच्या पापासाठी प्रायश्चित करू शकेन.”