मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. येशूंनी आपल्या शिष्यांना सांगितले: “एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचा कारभारी संपत्तीचा दुरुपयोग करतो असा आरोप त्याच्यावर होता.

  2. जगातील संपत्ती आपल्याला मित्र मिळविण्यासाठी वापरा म्हणजे ज्यावेळेस ती नाहीशी होईल तेव्हा तुम्हाला सार्वकालिक घरामध्ये निश्चितपणे प्रवेश मिळेल.

  3. हे ऐकून परूश्यांनी त्यांचा उपहास केला, कारण ते पैशावर प्रेम करत होते.

  4. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही स्वतःस दुसर्‍यांच्या दृष्टीने नीतिमान ठरविणारे आहात, परंतु परमेश्वर तुमचे हृदय जाणून आहे. लोक ज्याला महत्त्व देतात त्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने तुच्छ आहेत.

  5. “परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस.

  6. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “लोकांना अडखळण होतील अशा गोष्टी निश्चितच येतीलच, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याचा धिक्कार असो.

  7. एके दिवशी शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.”

  8. प्रभू येशूंनी उत्तर दिले, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असला, तरी या तुतीच्या झाडाला म्हणाल की ‘तू उपटून समुद्रात लावला जा,’ तरी ते तुमची आज्ञा पाळील.

  9. सांगितलेले काम केल्याबद्दल तो आपल्या दासाचे आभार मानेल काय?

  10. यरुशलेमकडे वाटचाल करत येशू प्रवास करीत गालील प्रांत आणि शोमरोनच्या हद्दीवर आले.

  11. ते गावात जात असताना, काही अंतरावर उभे असलेले दहा कुष्ठरोगी त्यांना भेटले.

  12. हे कुष्ठरोगी येशूंना मोठ्याने हाक मारून म्हणत होते, “येशू महाराज, आमच्यावर दया करा!”

  13. त्यांना पाहून येशू म्हणाले, “तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा.” आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.

  14. तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.

  15. येशूंनी विचारले, “मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत?

  16. मग येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि जा; तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

  17. काही परूश्यांनी विचारले, “परमेश्वराचे राज्य केव्हा येईल?” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “दृश्य रूपाने नजरेस पडेल अशा रीतीने परमेश्वराचे राज्य येत नाही,

  18. ते शिष्यांना म्हणाले, “अशी वेळ येत आहे की, मानवपुत्राच्या राज्याचा एक दिवस पाहावा अशी तुम्हाला उत्कंठा लागेल, परंतु तुम्हाला ते दिसणार नाही.

  19. कारण वीज चमकली म्हणजे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत प्रकाशते, तशाच प्रकारे मानवपुत्राच्या दिवसात होईल.

  20. परंतु प्रथम त्याने अनेक दुःखे सोसणे आणि या पिढीकडून नाकारले जाणे आवश्यक आहे.

  21. “जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या दिवसात होईल.

  22. “मानवपुत्र प्रकट होईल त्या दिवशीही हे अशाच प्रकारे असेल.

  23. मी तुम्हाला सांगतो की, त्या रात्री दोघेजण एका अंथरुणात झोपलेले असतील; एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.

  24. यावर शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, त्यांना कुठे नेण्यात येईल?” येशूंनी उत्तर दिले, “जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.”

  25. नंतर येशूंनी आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करावी व ती ही चिकाटीने करावी यासाठी एक दाखला सांगितला.