मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे सर्वजण व येशूंची आई मरीया, त्यांचे भाऊ, इतर स्त्रिया एकत्र येऊन सतत प्रार्थनेत वेळ घालवित असत.

  2. तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते.

  3. यास्तव हे आवश्यक आहे की अशा व्यक्तींपैकी एकाची निवड आपण करावी की, जो प्रभू येशू आपल्यामध्ये राहत होते त्या वेळेपासून आतापर्यंत सर्व वेळ आपल्याबरोबर राहात आलेला आहे,

  4. प्रारंभीपासून म्हणजे योहानाकडून येशूंचा बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून येशूंना स्वर्गात घेतले जाईपर्यंत, कारण यांच्यामधून एकाने आपल्याबरोबर येशूंच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार असणे आवश्यक आहे.”

  5. नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा,

  6. “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  7. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील.

  8. प्रभूचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.

  9. आणि जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’

  10. “अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली.

  11. परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते.

  12. दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.

  13. कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही.

  14. परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून असे अभिवचन दिले होते, त्याच्या वंशजांपैकी एकाला ते त्याच्या सिंहासनावर बसवतील.

  15. पुढे होणार्‍या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही.

  16. त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत.

  17. आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात.

  18. कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले:

  19. “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  20. “यास्तव इस्राएलातील सर्वजणांनी खात्री करून घ्यावीः ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर दिले होते, त्यांना परमेश्वराने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे.”

  21. पेत्राने उत्तर दिले, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

  22. हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.”

  23. परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली.

  24. परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”

  25. अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे परमेश्वर, जे आपल्या पूर्वजांचे परमेश्वर आहेत, त्यांनी त्यांचा सेवक येशूंना गौरविले आहे. त्याच येशूंना मारून टाकले जावे यासाठी तुम्ही त्यांना धरून दिले आणि पिलातासमोर तुम्ही त्यांना नाकारले. जरी पिलाताने त्यांना सोडून देण्याचा निश्चय केला होता,