मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती बाहेर समुद्रावर जाळे पसरण्याचे स्थान होईल, कारण मी हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात. ती राष्ट्रांसाठी लूट होईल,

  2. आणि भूप्रदेशात असलेले तिचे लोक तलवारीने पडतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  3. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन.

  4. तुझ्या गीतांचा आवाज मी बंद पाडेन आणि तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही.

  5. मी तुला उघडे खडक बनवीन आणि तू मासेमारीचे जाळे पसरविण्याचे ठिकाण बनशील. तू कधीही पुनर्स्थापित होणार नाहीस, कारण मी याहवेह हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  6. “सोर शहरास सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी लोकांच्या कण्हण्याने आणि तुझ्यात होत असलेल्या कत्तलीमुळे समुद्रतटांचा थरकाप होणार नाही काय?

  7. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यामध्ये कोणी आणखी वस्ती करीत नाही, अशा शहरांसारखे जेव्हा मी तुला ओसाड शहर करेन आणि जेव्हा मी खोल समुद्र तुझ्यावर आणेन आणि त्याचे प्रचंड पाणी तुला झाकून टाकेल,

  8. आणि जे खाली गर्तेत आधी गेले आहेत त्यांच्याजवळ मी तुला खाली आणेन. पृथ्वीच्या खाली, अधोलोकाच्या खोल गर्तेत जिथे पुरातन ओसाडी आहेत, जे तिथे खाली गर्तेत आहेत आणि जे परत येणार नाहीत किंवा या जिवंतांच्या भूमीवर तुझे स्थान घेणार नाहीत अशा ठिकाणी मी तुला वसवीन.

  9. मी तुझा भयंकर शेवट करेन आणि तुझे अस्तित्व मी नाहीसे करेन. तुझा शोध घेतला, तरी तू पुन्हा कधीही सापडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  10. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  11. सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘अगे सोर, तू म्हणतेस, “मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.”

  12. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  13. “मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.

  14. “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘कारण तू स्वतःला ज्ञानी, अगदी देवासारखे ज्ञानी समजतोस,

  15. म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन, जे राष्ट्रांमध्ये सर्वात क्रूर आहेत; तुझे सौंदर्य व ज्ञान याविरुद्ध ते त्यांची तलवार उपसतील आणि ती तुझ्या चमकत्या वैभवाला भेदून जाईल.

  16. तेव्हा जे लोक तुला मारतात त्यांच्यादेखत तू म्हणशील काय, “मी देव आहे?” जे तुझा वध करतात त्यांच्या हातात, तू केवळ मानव असशील, देव नाही.

  17. परकीय लोकांच्या हातून तू बेसुंती लोकांसारखा मृत्यू पावशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात.’ ”

  18. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  19. “मानवपुत्रा, सोरच्या राजासाठी विलाप कर आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तू पूर्णतेची मुद्रा होता, जो ज्ञानाने भरलेला व सौंदर्याने परिपूर्ण होता.

  20. तू एदेन बागेत, परमेश्वराच्या बागेत होतास; प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजेच अलाक, पुष्कराज आणि हिरा, लसणा, गोमेद, यास्फे आणि नीलमणी, पाचू, माणिक व रत्ने अशांनी तू सजला होता. तुझ्या बैठकी व पाटे सोन्याच्या घडल्या होत्या; तू जन्मला त्याच दिवशी ते तयार केले होते.

  21. संरक्षक करूब म्हणून तुला अभिषिक्त केले, म्हणून मी तुझी नेमणूक केली. परमेश्वराच्या पवित्र डोंगरावर होता; आणि तू अग्निपाषाणात फिरत असे.

  22. तुझ्या विस्तारित व्यापारामुळे तू आतंकाने भरला आणि तू पाप केले. म्हणून लज्जेने मी तुला परमेश्वराच्या डोंगरावरून लोटून दिले, आणि हे संरक्षक करुबा, मी तुला अग्निपाषाणातून काढून टाकले.

  23. तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे अहंकारी झाले, आणि तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाला भ्रष्ट केले. म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिले; आणि राजांसमोर मी तुला तमाशा असे केले.

  24. तुझ्या पुष्कळ पापाने व खोट्या व्यापारामुळे तू तुझी पवित्रस्थाने विटाळलीस. म्हणून तुझ्यातून अग्नी येईल आणि तुला भस्म करेल असे मी केले, आणि सर्व बघणार्‍यांच्या देखत मी तुला राखेत मिळविले.

  25. याहवेहचे वचन माझ्याकडे आले: