मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे सीदोन नगरी, मी तुझ्याविरुद्ध आहे, आणि तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन. जेव्हा मी तुला शिक्षेने पिडेन, आणि तुझ्यात मी पवित्र मानला जाईन तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.

  2. मी तुझ्यावर मरी पाठवेन आणि तुझ्या रस्त्यांवर रक्त वाहवीन. चहूकडून तुझ्याविरुद्ध चालविलेल्या तलवारीने वधलेले तुझ्यातच पडतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  3. “ ‘इस्राएली लोकांना काटेरी झुडूपांसारखे आणि धारदार काट्यांप्रमाणे द्वेष्ट वृत्ती असलेले शेजारी आणखी नसतील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.

  4. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक पांगले आहेत तिथून मी त्यांना जेव्हा एकवट करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे राष्ट्रांच्या देखत मी पवित्र मानला जाईन. तेव्हा जो देश मी माझा सेवक याकोबाला देऊ केला होता, ते त्यांच्या त्या स्वदेशात राहतील.

  5. ते तिथे सुरक्षित राहतील आणि घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. ते सुरक्षित असतील जेव्हा मी त्यांचे शेजारी ज्यांनी माझ्या लोकांची चहाडी केली त्यांना मी दंडाने पिडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.’ ”

  6. दहाव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  7. त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे, तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो. तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे; तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.”

  8. मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझ्या प्रवाहातील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील असे मी करेन. मी तुला तुझ्या प्रवाहातून ओढून बाहेर काढेन आणि त्यातील सर्व मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.

  9. मी तुला व तुझ्या प्रवाहातील सर्व माशांना वाळवंटात सोडून देईन. तू मोकळ्या मैदानात पडशील आणि तुला ना कोणी जवळ करणार ना उचलणार. पृथ्वीवरील प्राणी व आकाशातील पक्ष्यांसाठी तू खाद्य होशील.

  10. तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू इस्राएल लोकांसाठी बोरूच्या काठीप्रमाणे होतास.

  11. “ ‘यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध तलवार आणेन, मनुष्य व जनावरे या दोघांनाही मारून टाकीन.

  12. इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू म्हणालास, “नाईल नदी माझी आहे; मी ती निर्माण केली,”

  13. म्हणून मी तुझ्याविरुद्ध आणि तुझ्या प्रवाहांच्या विरुद्ध आहे आणि मिग्दोलपासून असवानपर्यंत, अगदी कूशच्या सीमेपर्यंत मी इजिप्त देश ओसाड व वैराण करेन.

  14. उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन.

  15. “ ‘तरीही, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: चाळीस वर्षे संपल्यावर जिथे ते विखुरले गेले त्या राष्ट्रांमधून इजिप्तच्या लोकांना मी एकवट करेन.

  16. बंदिवासातून मी त्यांना इजिप्तच्या पथरोस भागात, त्यांच्या पूर्वजांचा देश पत्रोसला परत आणेन, तिथे ते कमी दर्जाचे राज्य होईल.

  17. ते सर्वात कमी दर्जाचे राज्य असतील आणि कधीही इतर राष्ट्रांच्या वर होणार नाहीत. मी त्याला इतके कमी करेन की ते राष्ट्रांवर पुन्हा राज्य करणार नाही.

  18. इजिप्त यापुढे इस्राएल लोकांसाठी आणखी आधार नसतील परंतु त्यांच्या पापाची आठवण म्हणून ते त्यांच्याकडे मदतीसाठी जातील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ ”

  19. सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  20. यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल.

  21. त्याने केलेल्या परिश्रमासाठी मी त्याला इजिप्त देश त्याचे प्रतिफळ म्हणून दिला आहे, कारण त्याने व त्याच्या सैन्याने ते माझ्यासाठी केले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. “त्या दिवशी मी इस्राएलच्या घराण्याचे शिंग लांब उगवेन आणि त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”

  23. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  24. “मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आक्रोश करून सांग, “त्या दिवसाला हाय हाय!”

  25. कारण दिवस जवळ आहे, याहवेहचा दिवस जवळ आहे; तो आभाळाचा दिवस, राष्ट्रांच्या नाशाचा दिवस असेल.