मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणजे जी अश्लीलता व वेश्यावृत्ती तू इजिप्तमध्ये चालू केली तिचा शेवट मी करेन. या गोष्टींकडे तू पुन्हा पाहणार नाहीस आणि यापुढे इजिप्तचे स्मरण आणखी करणार नाहीस.

  2. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यांचा तू द्वेष करतेस, तिरस्काराने ज्यांच्यापासून तू दूर झालीस त्यांच्या हाती मी तुला देत आहे.

  3. तुझी अश्लीलता व दुराचारांनी हे सर्व तू तुझ्यावर ओढवून घेतले आहे, कारण तू राष्ट्रांची अभिलाषा धरलीस आणि त्यांच्या मूर्तींनी स्वतःला विटाळून टाकले.

  4. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन.

  5. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील, जो पेला मोठा व खोल आहे; तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल, कारण त्यात पुष्कळ मावते.

  6. तू तो पेला पिऊन कोरडा करशील आणि त्याचे तुकडे चावशील; आणि तू आपली छाती फाडशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  7. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.”

  8. याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ओहोलाह व ओहोलीबाहचा न्याय तू करशील काय? मग त्यांच्या अमंगळ कृत्यांबद्दल त्यांचा निषेध कर.

  9. कारण त्यांनी व्यभिचार केला आहे आणि रक्त त्यांच्या हातावर आहे. त्यांनी त्यांच्या मूर्तींशी व्यभिचार केला; त्या मूर्तींना अन्न म्हणून ज्या लेकरांना त्यांनी माझ्यापासून जन्म दिला त्यांचा यज्ञ त्यांनी मूर्तींना केला.

  10. त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले.

  11. त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेकरांचे यज्ञ त्यांच्या मूर्तींना केले, ते माझ्या पवित्रस्थानात आले आणि ते अपवित्र केले. माझ्या घरात त्यांनी ही कृत्ये केली.

  12. तू एका सुंदर पलंगावर बसलीस, ज्यापुढे एक मेज ठेवलास त्यावर जे माझे होते ते धूप व जैतुनाचे तेल ठेवले.

  13. तेव्हा जी स्त्री व्यभिचार करून निकामी झाली होती तिच्याविषयी म्हटले, ‘वेश्या म्हणून त्यांनी तिचा उपयोग करावा, कारण ती वेश्याच तर आहे.’

  14. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्यांच्याविरुद्ध मोठा जमाव आणा आणि त्यांना आतंक व लुटेच्या स्वाधीन करा.

  15. “देशातील अश्लीलतेचा मी शेवट करेन, म्हणजे सर्व स्त्रिया सावध राहतील आणि तुमच्याप्रमाणे त्या करणार नाही.

  16. तुमच्या अश्लीलतेचा दंड तुम्ही भोगाल आणि तुमच्या मूर्तिपूजेच्या पापाचे परिणाम तुम्ही भोगाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.”

  17. नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  18. या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव आणि त्यात पाणी ओत.

  19. “ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो, ज्या कढईला गंज लागला आहे, ज्याचा थर जाणार नाही! जसे काढता येईल तसा एकएक मांसाचा तुकडा काढून घ्या.

  20. कोप भडकवावा व सूड घ्यावा म्हणून मी तिचे रक्त उघड्या खडकावर ओतेन, म्हणजे ते झाकले जाणार नाही.

  21. “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो! मी देखील लाकडाचा ढीग उंच करेन.

  22. “ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.

  23. “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  24. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  25. “हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस.