God
God चा उल्लेख असलेली वचने
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
आणि इस्राएलाच्या भूमीला सांग: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध आहे. माझ्या म्यानातून मी माझी तलवार उपसून नीतिमान आणि दुष्ट अशा दोघांनाही तुझ्यातून छेदून टाकेन.
कारण मी नीतिमानास व दुष्टास छेदून टाकणार आहे, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येकाविरुद्ध माझी तलवार म्यानातून उपसली जाईल.
तेव्हा सर्व लोक जाणतील मी याहवेहने आपल्या म्यानातून तलवार उपसली आहे; ती परत त्यात जाणार नाही.’
आणि जेव्हा ते तुला विचारतील, ‘तू उसासे का टाकतोस?’ तू सांग की, ‘जी वार्ता येणार आहे म्हणून प्रत्येक हृदय भीतीने विरघळेल आणि प्रत्येक हात लुळा पडेल; प्रत्येक आत्मा अशक्त होईल आणि प्रत्येक पाय मुत्राने भिजेल.’ ते येत आहे! ते नक्कीच घडणार, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘प्रभू असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, धार लावलेली आणि चमकविलेली;
कत्तल करण्यास धार लावलेली, विजेप्रमाणे चमकणारी अशी केलेली! “ ‘माझ्या राजपुत्राच्या राजदंडामुळे आम्ही आनंद करावा काय? तलवार अशा प्रत्येक काठीला तुच्छ लेखते.
“ ‘हातात धरता यावी म्हणून, तलवार चमकण्यास नेमली आहे; ती धारदार व चमकविली गेली आहे, आणि कत्तल करणार्याच्या हातासाठी ती तयार केली गेली आहे.
हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. माझ्या लोकांसहित त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. म्हणून तू आपले ऊर बडव.
“ ‘कसोटी खचितच होणार आणि तलवारीने तुच्छ लेखलेला राजदंड पुढे चालला नाही तर काय होईल? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’
म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील आणि पुष्कळ पडतील, कत्तल करण्यासाठीच ही तलवार त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे. पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे, हत्येसाठी ती उपसली गेली आहे.
मी सुद्धा माझा हात हातावर मारीन, आणि माझा क्रोध शांत होईल. मी याहवेह हे बोललो आहे.”
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही लोकांनी उघड बंड करून आणि तुम्ही जे काही करता त्याद्वारे तुमचे अपराध उघड करून, तुमच्या मनात दोष आणला आहे; आणि तुम्ही असे केले आहे म्हणून तुम्ही बंदिवासात नेले जाल.
त्या तुला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझा टोप उतरव, मुकुट काढून टाक. तो जसा होता तसा आता नसेल: जे नम्र ते उंच केले जातील व जे उंच ते नम्र केले जातील.
नाश! नाश! मी याचा नाश करेन! ज्याच्याकडे त्या मुकुटाचा खरा अधिकार आहे तो येईपर्यंत हा मुकुट पुनर्स्थापित होणार नाही; त्यालाच मी तो देईन.’
“आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, कत्तल करण्यास उपसलेली, नाश करण्यास व विजेप्रमाणे; ती चमकविलेली व चमकणारी आहे!
“ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या. ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली, तुझ्या पूर्वजांच्या भूमीत, मी तुझा न्याय करेन.
मी माझा क्रोध तुझ्यावर ओतेन आणि माझ्या कोपाचा अग्नी तुझ्यावर फुंकेन; क्रूर लोक जे नाश करण्यात निपुण आहेत, त्यांच्या हाती मी तुला सोपवेन.
तू अग्नीला इंधन अशी होशील, तुझे रक्त तुझ्याच देशात सांडेल, तुझी आठवण आणखी केली जाणार नाही; कारण मी याहवेह हे बोललो आहे.’ ”
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे नगरी, तू रक्तपात करून व मूर्ती बनवून स्वतःला अशुद्ध करून आपला नाश ओढवून घेतला आहेस,
जो रक्तपात तू केलास त्यामुळे तू दोषी झालीस आणि ज्या मूर्ती तू बनविल्यास त्यामुळे तू विटाळली आहेस. तुझे दिवस जवळ आणले आहेस आणि तुझ्या वर्षांचा शेवट आला आहे. म्हणून मी तुला राष्ट्राकरिता निंदा व देशांसाठी हास्य असे करेन.
तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंचा अवमान केला आणि माझे शब्बाथ अपवित्र केले आहेत.