God
God चा उल्लेख असलेली वचने
दुष्टाच्या मरणात मी आनंद पावतो काय? परंतु आपल्या मार्गापासून वळून ते जीवन जगतात त्यात मी संतुष्ट नाही काय? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
“तरीही तुम्ही म्हणता: ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकांनो ऐका: माझा मार्ग अन्यायी आहे काय? जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?
तरीही इस्राएल लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकहो, जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?
“म्हणून, सार्वभौम याहवेह जाहीर करतात, तुम्ही अहो इस्राएल लोकहो, मी तुम्हा प्रत्येकाचा तुमच्या स्वतःच्या कृत्यांनुसार न्याय करेन. पश्चात्ताप करा! तुमच्या सर्व पापांपासून दूर वळा; म्हणजे तुमचे पाप तुमच्या पतनाचे कारण होणार नाही.
कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!
सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, इस्राएलातील काही वडील लोक याहवेहकडून विचारण्यास आले आणि ते माझ्यापुढे बसले.
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्याकडून विचारपूस करण्यास तुम्ही आला आहात काय? माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’
आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलची मी निवड केली, त्या दिवशी, मी शपथ घेतली व याकोबाच्या वंशजांकडे आपला हात उंच केला व मी स्वतः इजिप्तमध्ये त्यांना प्रकट झालो. उंचावलेल्या हाताने मी त्यांना म्हटले, “मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे.
आणि मी त्यांना म्हटले, “तुम्ही प्रत्येकाने ज्या घृणास्पद मूर्तींवर आपली नजर लावली आहे, त्या टाकून द्या, आणि इजिप्तच्या मूर्तींनी स्वतःस विटाळू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
“ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन.
परंतु माझ्या नावासाठी मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. ज्या लोकांमध्ये ते राहिले आणि ज्यांच्यासमोर मी इस्राएली लोकांना प्रकट झालो, त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी असे केले
म्हणून त्यांना मी इजिप्तमधून काढले आणि त्यांना रानात आणले.
त्यांना मी माझे विधी दिले आणि त्यांना माझे नियम कळविले, ज्यामुळे जे लोक त्याचे पालन करतील ते जगतील.
त्याचप्रमाणे आमच्यामधील चिन्ह म्हणून मी त्यांना माझा शब्बाथ दिला, यासाठी की त्यांनी जाणावे की मी याहवेहने त्यांना पवित्र केले आहे.
“ ‘तरीही इस्राएली लोकांनी रानात माझ्याविरुद्ध बंड केले. त्यांनी माझे विधी पाळले नाही तर माझ्या नियमांचा धिक्कार केला; ज्यामुळे ज्यांनी नियमाचे पालन केले असते ते जगले असते; आणि त्यांनी माझ्या शब्बाथाला पूर्णपणे अपवित्र केले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात त्यांचा नाश करेन.
परंतु ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले.
आणि रानात माझा हात उंच करून मी त्यांच्याशी शपथ वाहिली की दूध व मध वाहणारा देश; जो सर्वात सुंदर देश मी त्यांना देऊ केला होतात, त्यात मी त्यांना नेणार नाही;
कारण त्यांनी माझ्या नियमांचा धिक्कार केला आणि माझ्या विधींचे पालन केले नाही आणि माझे शब्बाथ विटाळले. कारण त्यांचे हृदय त्यांच्या मूर्तींकडे लागलेले होते.
तरीही मी त्यांच्याकडे दयेने पाहिले आणि रानात मी त्यांचा नाश करून त्यांचा शेवट केला नाही.
त्यांच्या लेकरांना मी रानात म्हटले, “तुमच्या आईवडिलांच्या कायद्याचे अनुसरण करू नका किंवा त्यांचे नियम पाळू नका व त्यांच्या मूर्तींमुळे तुम्हास विटाळू नका.
मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्या विधींचे अनुसरण करा आणि काळजीपूर्वक माझे नियम पाळा.
माझे शब्बाथ पवित्र माना, यासाठी की ते आपल्यातील चिन्ह असावे. मग तुम्ही जाणाल की मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
“ ‘परंतु त्यांच्या लेकरांनी माझ्याविरुद्ध बंड केले: त्यांनी माझ्या विधींचे अनुसरण केले नाही, माझे नियम त्यांनी काळजीपूर्वक पाळले नाही, ज्याविषयी मी म्हटले होते, “की जे त्याचे पालन करतील ते त्यानुसार जगतील,” आणि त्या लोकांनी माझे शब्बाथ विटाळले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात माझा कोप त्यांच्याविरुद्ध दाखवेन.