Skip to content
नहेम्याह ११:२०-३६

नहेम्याह ११:२०-३६

२०
राहिलेले इस्राएली, याजक व लेवीसह यहूदीयाच्या सर्व नगरात, आपआपल्या घराण्यांची वतने जिथे होती, तिथे राहत असत.
२१
तरी मंदिराची सेवा करणारे, ज्यांचे पुढारी झीहा व गिश्पा होते, ते सर्वजण ओफेल येथे राहत.
२२
यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्‍यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते.
२३
राजाने संगीतकार म्हणून त्यांची नेमणूक केली होती व त्यांचे दररोजचे कार्य निर्धारित केले होते.
२४
पथह्याह, तो मशेजबेलचा पुत्र, तो जेरहाचा वंशज, जो यहूदाहचा पुत्र होता, हा लोकसेवेच्या कामी राजाचा प्रतिनिधी होता.
२५
यहूदीयाचे लोक राहत असलेली काही गावे व शेती होती, काही लोक किर्याथ-अर्बा व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, दिबोन व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, यकब्सेल आणि त्यांच्या आसपासची गावे:
२६
येशूआ, मोलादाह, बेथ-पेलेट,
२७
हसर-शुआल, बेअर-शेबा, आणि त्यांची आसपासची गावे,
२८
सिकलाग, मकोनाह व त्यांची आसपासची गावे.
२९
एन-रिम्मोन, सोराह, यर्मूथ,
३०
जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्‍यापर्यंत वस्ती केली.
३१
बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे,
३२
अनाथोथ, नोब, अनन्याह,
३३
हासोर, रामाह, गित्ताइम,
३४
हादीद, सबोईम, नेबल्लाट,
३५
लोद व ओनो व गे-हाराशीम.
३६
यहूदीयामध्ये राहणारे काही लेवी बिन्यामीन गोत्राच्या लोकांबरोबर राहण्यासाठी गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options