मुख्य मजकुरावर जा
इय्योब १९:१३-२२

पूर्ण एकाकीपणा व शारीरिक क्षय

इय्योब १९:१३-२२
१३
“माझे बंधुजन त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत; माझे परिचित मला अगदी परके झाले आहेत.
१४
माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत; माझ्या जिवलग मित्रांना माझा विसर पडला आहे.
१५
माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात; अनोळखी माणसाप्रमाणे ते माझ्याकडे बघतात.
१६
मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो, आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही.
१७
माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे; माझ्या परिवारासाठी मी घृणास्पद असा आहे.
१८
लहान मुलेदेखील माझी निंदा करतात; मी दिसलो तरी ते माझा अपमान करतात.
१९
माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो; ज्यांच्यावर मी प्रीती केली, तेही माझ्यावर उलटले.
२०
मी आता फक्त हाडे व कातडी असा उरलो आहे; आणि मृत्यूच्या संकटातून थोडक्यात निभावून गेलो आहे.
२१
“माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा, कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे.
२२
परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता? माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options