मुख्य मजकुरावर जा
अनुवाद २:२४-३७

अमोरी सीहोनला जिंकण्याची आज्ञा

अनुवाद २:२४-३७
२४
“आता उठा आणि आर्णोन नदी ओलांडून जा. पाहा, हेशबोनचा राजा अमोरी सीहोन आणि त्याचा देश मी तुमच्या हाती दिला आहे. तो देश ताब्यात घेण्यास सुरुवात करा व त्याच्याशी युद्ध करा.
२५
आजपासून पुढे मी असे करेन की अखिल पृथ्वीतलावरील लोक तुमच्यापुढे भीतीने थरथर कापतील व तुमच्या आगमनाची चाहूल लागताच दहशत घेतील.”
२६
नंतर शांततेची बोलणी करण्याकरिता मी केदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले,
२७
“आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही मुख्य रस्त्यावरच राहू; उजवीकडे वा डावीकडे वळणारही नाही.
२८
आम्ही वाटेने जात असताना तुमचे अन्न व पाणी तुमच्याकडून चांदीच्या किमतीत विकत घेऊ. तुमच्या देशातून पायी चालत जाण्याची फक्त आम्हाला परवानगी द्या—
२९
सेईरमध्ये राहणारे एसावाचे वंशज आणि आरवासी मोआबी यांनी आमच्यासाठी केले—आम्ही यार्देन ओलांडून याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत असलेल्या देशात जाईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत करा.”
३०
परंतु हेशबोनाच्या सीहोन राजाने आम्हाला जाण्यास परवानगी दिली नाही. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्याला तुमच्या हातात देण्यासाठी त्याचा आत्मा हट्टी आणि त्याचे हृदय कठीण केले होते.
३१
मग याहवेह म्हणाले, “सीहोन राजाचा देश तुम्हाला देण्यास मी आता सुरुवात केली आहे. जेव्हा तुम्ही तो देश ताब्यात घ्याल, तेव्हा तो कायमचा तुमच्या मालकीचा होईल.”
३२
सीहोन आणि त्याची सर्व सेना आमच्यासोबत युद्ध करण्यास याहस येथे एकत्रित झाली,
३३
परंतु याहवेह आमच्या परमेश्वराने त्याला आमच्या अधीन केले, आम्ही त्याला, त्याच्या पुत्रांसह संपूर्ण सेनेला चिरडून टाकले.
३४
त्यावेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली. त्यांच्या सर्वांचा नाश केला—पुरुष, स्त्रिया आणि मुले. आम्ही कोणालाही जिवंत सोडले नाही.
३५
फक्त त्यांची गुरे जिवंत ठेवली. त्यांची नगरे काबीज करून ती सर्व संपत्ती आम्ही घेतली.
३६
आर्णोन खोर्‍याच्या कडेला असलेल्या अरोएर शहरापासून खोर्‍यातील शहरापर्यंत व त्या शहरापासून गिलआदापर्यंत एकही दुर्गम शहर राहिले नाही. याहवेह आमच्या परमेश्वराने हे सर्व आमच्या अधीन करून दिले.
३७
मात्र याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार अम्मोनी लोकांच्या प्रदेशापासून आम्ही दूरच राहिलो. तसेच यब्बोक नदी व त्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या शहरापासूनही आम्ही दूर राहिलो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options