Vineyard बद्दल बायबलमधील वचने: Parables of
Parables of बद्दल वचने
माझी ज्यांच्यावर प्रीती आहे त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन: सुपीक डोंगराळ भागावर माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता.
त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.
“आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा.
माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?
आता मी तुम्हाला सांगेन, मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: मी त्याचे कुंपण काढून टाकेन, आणि त्याचा नाश होईल; मी त्याची भिंत पाडेन, आणि ते तुडविले जाईल.
मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”
इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.
त्या दिवशी— “फलवंत द्राक्षमळ्याबद्दल गीत गा:
मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; मी त्याला सतत पाणी देतो. मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.
अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.
“स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.
एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.
“सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.
त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’
म्हणून ते गेले. “तो पुन्हा दुपारच्या सुमारास बाहेर गेला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही त्याने असेच केले.
पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’
“ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’
“संध्याकाळी धन्याने आपल्या मुकादमाला सांगितले, ‘द्राक्षमळ्यामध्ये आलेल्या मजुरांना बोलवा आणि जे शेवटी आले होते त्यांच्यापासून आरंभ करून जे प्रथम आले होते त्या सर्वांना मजुरी द्या.’
“तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.
त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली.
जेव्हा त्यांना ती मिळाली, तेव्हा त्यांनी धन्याविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली.
‘त्या माणसांनी फक्त एकच तास काम केले, तरी त्यांना तुम्ही दिवसभराची मजुरी दिली आणि आम्ही येथे सकाळपासून उन्हात दिवसभर राबलो, तरी आम्हाला तुम्ही त्यांच्यासारखेच केले.’
“त्याने त्यांच्यापैकी एकाला म्हटले, ‘मित्रा, तुझ्यावर मी कोणताही अन्याय केलेला नाही; याच मजुरीत दिवसभर काम करण्याचे तू कबूल केले होतेस की नाही?
मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते.
माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’