मुख्य मजकुरावर जा

Unity of God बद्दल बायबलमधील वचने: God himself

4 वचने · 20 पैलू

"Unity of God" साठी शोधा

God himself बद्दल वचने

  1. “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.

  2. भिऊ नका, थरथर कापू नका. मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का? तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय? नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.”

  3. याहवेह असे म्हणतात— ज्यांनी आकाशे निर्माण केली तेच परमेश्वर आहेत; ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली, ती प्रस्थापित केली; ती ओसाड व निर्जन घडविली नाही, परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली— ते म्हणतात: “मीच याहवेह आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.

  4. पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.