मुख्य मजकुरावर जा

Unity of God बद्दल बायबलमधील वचने: His works of creation and providence

5 वचने · 20 पैलू

His works of creation and providence बद्दल वचने

  1. “याहवेह असे म्हणतात; तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली: मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले, मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, ज्याने आकाश ताणले, ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली,

  2. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही. तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला सामर्थ्य देईन.

  3. मग सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;

  4. मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.

  5. “अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या; मेघ त्यांचा वर्षाव करोत, पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो, तारण उसळून वर येवो त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो; मी, याहवेहने हे निर्माण केले आहे.