मुख्य मजकुरावर जा

Unity of God बद्दल बायबलमधील वचने: His unparalleled election and care of his people

4 वचने · 20 पैलू

"Unity of God" साठी शोधा

His unparalleled election and care of his people बद्दल वचने

  1. परमेश्वराने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले त्या दिवसापासून आतापर्यंत तुमच्या आधी होऊन गेलेल्या दिवसांना विचारा आणि आकाशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत विचारा की, अशा प्रकारची महान गोष्ट पूर्वी कधी घडली होती का किंवा अशी गोष्ट कुठे घडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का?

  2. अग्नीमधून बोलताना परमेश्वराची वाणी कोणी कधी ऐकली, ज्याप्रकारे तुम्ही ऐकली आणि जिवंत राहिले आहेत काय?

  3. कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?

  4. त्यांनी या गोष्टी अशासाठी केल्या की, याहवेहच परमेश्वर आहेत हे तुम्हाला कळून यावे; त्यांच्यासारखा अन्य कोणीही नाही हे देखील समजावे.