- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Unbelief बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही?
जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्यांचे ऐकत नाही, याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.”
यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही.
आमचा पिता अब्राहाम त्यापेक्षा तू थोर आहेस काय? तो मरण पावला आणि संदेष्टेही. तू कोण आहेस असे तुला वाटते?”
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. माझ्या पित्याच्या नावाने मी जे कार्य करतो ते माझ्याविषयी साक्ष देतात,
परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत.
मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास, माझ्यावर विश्वास ठेऊ नका;
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, तर मी करत असलेल्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. म्हणजे तुमची खात्री होईल की पिता मजमध्ये आहे व मी पित्यामध्ये आहे.”
येशूंनी अनेक चिन्हे त्यांच्यासमोर केली असतानाही, ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते.
नेमके हेच भविष्य यशायाह संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले: “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि प्रभूचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?”
परंतु या कारणाने ते विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण, यशायाहने इतरत्र असेही म्हटले आहे:
“म्हणून परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत आणि त्यांची हृदये कठोर केली होती, म्हणजे त्यांना डोळ्यांनी दिसू नये, किंवा अंतःकरणाने समजू नये, किंवा ते वळू नये—जेणे करून मी त्यांना बरे करेन.”
“जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.
जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील.
सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.
जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल.
पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;
इतर शिष्य त्याला सांगू लागले, “आम्ही प्रभूला पाहिले!” परंतु तो त्यांना म्हणाला, “त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जिथे खिळे ठोकले होते तिथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.”
नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.”
यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्याबाबतीत होऊ नये:
“ ‘निंदा करणार्यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’”
परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले त्यांनी इतर गैरयहूद्यांना चिथावणी देऊन बंधुवर्गाविरुद्ध त्यांची मने विषाने भरली.
परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले.
परंतु काहीजण हटवादी झाले; त्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले आणि जाहीरपणे द्वेषाच्या भावनेने त्या मार्गाविषयी विषयी बोलू लागले. तेव्हा पौल त्यांच्यामधून निघून गेला व शिष्यांना आपल्याबरोबर घेऊन त्याने तुरन्नाच्या व्याख्यानगृहात रोज संवाद केला.
आणि मी पाहिले की प्रभू माझ्याबरोबर बोलत आहेत. ते मला म्हणाले, ‘ताबडतोब यरुशलेम सोडून जा, कारण येथील लोक माझ्याबद्दल जी साक्ष तू देशील ती ते स्वीकारणार नाहीत.’