Skip to content

Truth बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर.

  2. आणि याहवेह मोशे समोरून जाताना घोषणा केली, “याहवेह, याहवेह, दयाळू व कृपाळू परमेश्वर, मंदक्रोध, प्रीती व विश्वासूपण यात उदंड,

  3. तेच आमचे खडक आहेत, त्यांचे कार्य परिपूर्ण आहे. आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य असतात. विश्वासयोग्य परमेश्वर, जे कधीच चूक करीत नाही, ते न्यायी आणि सत्यनिष्ठ आहेत.

  4. “तर आता याहवेहचे भय धरा आणि संपूर्ण विश्वासूपणाने त्यांची सेवा करा. तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे आणि इजिप्तमध्ये राहत असताना ज्या देवतांची उपासना करीत होते, त्या टाकून द्या आणि याहवेहची सेवा करा.

  5. परंतु याहवेहचे भय धरून प्रामाणिकपणे तुमच्या सर्व हृदयाने त्यांची सेवा करण्याविषयी खात्री बाळगा; त्यांनी तुम्हासाठी जी महान कृत्ये केली आहेत ती लक्षात ठेवा.

  6. आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’

  7. “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.

  8. मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो; माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले.

  9. माझे दिवस तुमच्याच हातात आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून, माझा पाठलाग करणार्‍यांपासून तुम्हीच मला सोडवा.

  10. कारण याहवेहची वचने सरळ आहेत; आपल्या प्रत्येक कार्यात ते विश्वासयोग्य आहेत.

  11. हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही, मी तुमचा विश्वासूपणा आणि तुमच्या तारणाच्या मदतीची चर्चा करतो. सर्व मंडळीपासून तुमची प्रीतिपूर्ण दया आणि सत्य ही लपवित नाही.

  12. पाहा, अंतःकरणाची सत्यता तुम्हाला आवडते, म्हणून माझ्या खोल अंतर्यामाला तुमच्या ज्ञानाचे शिक्षण दिले.

  13. ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील; जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.

  14. कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.

  15. प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.

  16. पृथ्वीतून विश्वसनीयता उदय पावत आहे, आणि स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे.

  17. परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.

  18. तुमच्या राजासनाचा पाया नीती व न्याय आहे; करुणामय प्रीती व विश्वसनीयता सतत तुमच्यापुढे चालतात.

  19. सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत, पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत; ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.

  20. इस्राएलवरील त्यांची प्रीती आणि त्यांच्या विश्वसनीयतेचे त्यांना स्मरण झाले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या परमेश्वराने केलेले तारण पाहिले आहे.

  21. कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.

  22. कारण तुमचे वात्सल्य महान, गगनमंडळाहून उंच आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.

  23. जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.

  24. प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.

  25. प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो.