Skip to content

Truth बद्दल बायबलमधील वचने

91 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.

  2. शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा.

  3. आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला.

  4. आणि ज्या सर्वांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुष्टपणात आनंद मानला, त्या सर्वांना दोषी ठरविण्यात येईल.

  5. परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्‍या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.

  6. आणि या उद्देशाने त्यांनी मला या साक्षीसाठी घोषणा करणारा आणि प्रेषित म्हणून नियुक्त केले—मी खरे बोलतो, खोटे बोलत नाही—आणि गैरयहूदीयांचा विश्वासू आणि खरा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.

  7. जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

  8. हे लोक विवाह करण्यास मनाई करतील, जे अन्न विश्वासणार्‍यांनी आणि सत्य जाणणार्‍यांनी उपकारस्तुती करून स्वीकार करावे म्हणून परमेश्वराने निर्माण केले आहे ते वर्ज्य करावे, असे ते म्हणतील.

  9. आणि ज्यांच्यापासून सत्य हिरावून घेतले आहे आणि ज्यांना भक्ती द्रव्यलोभाचे एक साधन वाटते, अशा भ्रष्ट मनाच्या माणसांमध्ये सतत भांडणे होतात.

  10. तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.

  11. विरोध करणार्‍यांना नम्रतेने शिकविण्याचा प्रयत्न कर, कदाचित परमेश्वर त्यांना सत्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पश्चात्ताप देईल.

  12. यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धीचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत.

  13. ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.

  14. परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर नेणार्‍या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,

  15. आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून प्रीती करावी.

  16. कारण जे सत्य आमच्यामध्ये राहते आणि तेच आमच्याबरोबर कायम राहील.