मुख्य मजकुरावर जा

Trespass Offering बद्दल बायबलमधील वचने

42 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.

  2. कोणत्याही रोगग्रस्त व्यक्तीला त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीसमयी, जेव्हा त्यांना याजकाकडे आणले जाते तेव्हा हे नियम आहेत:

  3. नंतर याजकाने एक कोकरू व एकतृतीयांश लीटर जैतुनाचे तेल दोषार्पण म्हणून वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळावे.

  4. पवित्रस्थानात ज्या ठिकाणी पापार्पणाच्या व होमार्पणाच्या बलींचा वध करतात, त्या ठिकाणी याजकाने कोकराला ठार मारावे. पापार्पणातील बलीप्रमाणेच या दोषार्पणातील बली याजकाच्या हक्काचा आहे. हे परमपवित्र होय.

  5. मग याजकाने या दोषबलीचे काही रक्त घ्यावे आणि शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.

  6. जर तो गरीब असेल आणि इतके आणण्याची त्याची ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे. अन्नार्पणासाठी जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग आणावा,

  7. आणि ऐपतीप्रमाणे त्याने पारव्याची दोन पिल्ले किंवा दोन होले आणावे; त्यातील एक पापबली व दुसरा होमबली म्हणून अर्पण करावा.

  8. आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत.

  9. याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.

  10. “ ‘एखादा मनुष्य एखाद्या गुलाम स्त्रीसोबत झोपेल जी एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, परंतु ज्याला खंडणी दिली गेली नाही किंवा तिला स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे. तरीही त्यांना मृत्युदंड दिला जाऊ नये, कारण तिला मुक्त केले गेले नाही.

  11. त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे.

  12. त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.

  13. आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले.

  14. परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती, आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले, तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल, आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल.

  15. वेशीच्या देवडीमध्ये दोन्ही बाजूंना दोन मेज होते, ज्यावर होमार्पणे, पापार्पणे व दोषार्पणे वधली जात असत.

  16. अन्नार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे यातून ते खातील; आणि जे सर्वकाही इस्राएल लोक याहवेहस समर्पित करतात ते याजकांच्या मालकीचे होईल.

  17. तो मला म्हणाला, “हे ते ठिकाण आहे जिथे याजकांनी दोषार्पण व पापार्पण शिजवावे आणि धान्यार्पण भाजावे, यामुळे बाहेरील अंगणात आणणे व लोकांना शुद्ध करण्याचे टाळता येईल.”