मुख्य मजकुरावर जा

Trespass Offering बद्दल बायबलमधील वचने: Atonement made by

7 वचने · 25 पैलू

"Trespass Offering" साठी शोधा

Atonement made by बद्दल वचने

  1. आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

  2. दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.

  3. अशारितीने याजकाने त्यांच्या अशा प्रकारच्या कोणत्याही पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. अन्नार्पणासंबंधी सांगितल्याप्रमाणे, पापार्पणाचे उरलेले पीठ याजकाचे होईल.”

  4. पवित्र वस्तू दूषित करून त्यांनी जे पाप केले त्याची ते भरपाई करतील. त्यांनी भरपाईची रक्कम देऊन वर वीस टक्के अधिक दंड द्यावा. त्यांनी दोषार्पणाचा एक मेंढा याजकाकडे आणावा आणि याजक त्यांच्यासाठी तो मेंढा अर्पून प्रायश्चित्त करेल व त्यांची क्षमा होईल.

  5. त्यांनी निर्दोष मेंढा याजकाकडे न्यावा, तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा, म्हणजे याजक तो मेंढा अर्पून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त करेल, आणि अजाणतेने घडलेल्या पापाबद्दल त्यांची क्षमा होईल.

  6. याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”

  7. त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.