Trespass Offering बद्दल बायबलमधील वचने: A meat offering by the very poor
A meat offering by the very poor बद्दल वचने
“जर होले किंवा पारव्याची पिल्ले आणण्याइतकीही त्याची ऐपत नसेल, तर त्याने एफाचा दहावा भाग उत्तम पीठ आणावे. ते पापार्पण असल्यामुळे त्याने ते जैतुनाच्या तेलात मिश्रित करू नये किंवा त्यावर धूपही ठेवू नये.
त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातील मूठभर पीठ घेऊन संपूर्ण पापार्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून याहवेहला इतर अर्पणांचा होम करतात तसे त्याचे वेदीवर होम करावे. हे त्याच्यावतीने पापार्पण होय.
अशारितीने याजकाने त्यांच्या अशा प्रकारच्या कोणत्याही पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. अन्नार्पणासंबंधी सांगितल्याप्रमाणे, पापार्पणाचे उरलेले पीठ याजकाचे होईल.”