Skip to content

The Macedonian Empire बद्दल बायबलमधील वचने

39 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.

  2. त्यांच्यापैकी एकामधून दुसरे शिंग फुटले, लहान म्हणून त्याचा प्रारंभ झाला, परंतु दक्षिण, पूर्व आणि वैभवी देशाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढले.

  3. तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले.

  4. त्याने स्वतःला याहवेहच्या अधिपतीप्रमाणे उच्च केले; त्याने दररोज याहवेहला अर्पण केले जाणारे यज्ञ काढून घेतले आणि त्यांचे पवित्रस्थान पाडून टाकले.

  5. दैनंदिन यज्ञ बंडखोरीमुळे याहवेहचे लोक त्याच्या हाती देण्यात आले. त्याने जे काही केले त्यात उन्नती केली आणि सत्य मातीला मिळविले.

  6. “त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्‍न समजणारा तज्ञ असेल.

  7. त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल.

  8. तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.

  9. त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल.

  10. “दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल.

  11. काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.

  12. “तिच्या कुळातील एकाचा उदय होईल जो तिची जागा घेईल. तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करेल आणि त्याच्या किल्ल्यात प्रवेश करेल; तो त्यांच्याशी युद्ध करेल आणि विजयी होईल.

  13. तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल.

  14. मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल.

  15. त्याचे पुत्र युद्धाची तयारी करतील आणि प्रचंड सैन्य गोळा करतील. जे एका अप्रतिकार्य पुरासारखे पुढे जातील आणि युद्ध त्याच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातील.

  16. “नंतर दक्षिणेचा राजा क्रोधिष्ट होऊन पुढे जाईल आणि उत्तरेच्या राजाशी युद्ध करेल, जो एक मोठे सैन्य उभारेल, परंतु त्याचा पराभव होईल.

  17. जेव्हा सैन्याचा नाश होईल, तेव्हा दक्षिणेचा राजा गर्वाने धुंद होऊन जाईल आणि अनेक हजारो लोकांचा वध करेल, तरीही तो विजयी होणार नाही.

  18. कारण उत्तरेचा राजा दुसरे सैन्य उभे करेल, जे त्याच्या आधीच्या सैन्यापेक्षा मोठे असेल; आणि बर्‍याच वर्षानंतर तो पूर्ण तयारीने मोठ्या सैन्यासह पुढे जाईल.

  19. “त्या काळात अनेक दक्षिणेच्या राजाविरुद्ध उभे राहतील. तुझ्या स्वतःच्या लोकांपैकीच काही बंडखोर विचारांचे हिंसक लोकसुद्धा दृष्टान्त पूर्णतेसाठी विद्रोह करतील, परंतु ते अपयशी होतील.

  20. नंतर उत्तरेचा राजा येईल आणि आणि वेढा बांधून तटबंदी असलेले शहर ताब्यात घेईल. दक्षिणेकडील सैन्यांना प्रतिकार करण्यास शक्ती राहणार नाही; त्यांच्या सर्वोत्तम सैन्यालाही सामना करण्याची ताकद नसेल.

  21. आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल.

  22. तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही.

  23. यानंतर तो आपले लक्ष किनारपट्टीवरील शहरांकडे वळवील व त्यातील अनेक जिंकून घेईल. परंतु एक सेनापती त्याला प्रतिकार करेल व त्याला लाजिरवाणी माघार घ्यावी लागेल.

  24. यानंतर तो आपल्या स्वतःच्या देशातील दुर्गाकडे मोर्चा फिरवेल, पण तो ठेच लागून पडेल व त्याचे अस्तित्व सापडणार नाही.

  25. “त्याच्या जागी एकजण येईल, जो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवेल. काही वर्षात, त्याचा नाश केला जाईल, तरीही त्याचा नाश क्रोधाने किंवा युद्धात होणार नाही.