मुख्य मजकुरावर जा

The Macedonian Empire बद्दल बायबलमधील वचने

39 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल.

  2. मग त्याच्यापुढे मोठ्या सैन्याचा नाश होईल; तो आणि कराराचा राजपुत्र दोघेही नष्ट होतील.

  3. त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल.

  4. जेव्हा श्रीमंतांना राज्य सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो त्यांच्यावर आक्रमण करेल आणि असे यश प्राप्त करेल की, त्याच्या पित्याने किंवा त्याच्या पित्याच्या पित्याने प्राप्त केले नसेल. तो धन, लूट आणि संपत्ती आपल्या अनुयायांमध्ये वाटून देईल. तो किल्ले पाडण्याचा कट रचेल—पण फक्त काही काळासाठी.

  5. “प्रचंड सैन्य घेऊन तो दक्षिणेच्या राजाविरुद्ध आपले सामर्थ्य आणि धाडस उत्तेजित करेल. दक्षिणेचा राजाही प्रचंड आणि बलाढ्य सैन्यासह लढेल, परंतु त्याच्याविरुद्ध रचलेल्या कटामुळे तो तोंड देऊ शकणार नाही.

  6. जे राजाच्या मेजावर भोजन करीत असे ते त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील; त्याच्या सैन्याचा नाश होईल आणि बरेच लोक युद्धात मारले जातील.

  7. दोन्ही राजे मनात वाईट गोष्टी घेऊन एकाच मेजावर बसतील आणि एकमेकांशी खोटे बोलतील, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, कारण अंत ठरलेल्या वेळी होईल.

  8. उत्तरेचा राजा पुष्कळ धनसंपत्ती घेऊन आपल्या देशात परत येईल, परंतु त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध राहील. त्याच्या मनाला वाटेल तसा तो वागेल आणि मग आपल्या देशात परत येईल.

  9. “निर्धारित वेळी तो पुन्हा दक्षिणेवर आक्रमण करेल, परंतु पहिल्या दोन प्रसंगी झाले त्याहून अगदी वेगळे परिणाम आता होतील.

  10. आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.

  11. अनेक भीषण परीक्षेमध्ये, त्यांचा ओसंडणारा आनंद आणि कमालीच्या दैनावस्थेत त्यांची उदारता प्रत्यक्षात आली.

  12. त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो.

  13. प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली.

  14. आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.