मुख्य मजकुरावर जा

The Ammonites बद्दल बायबलमधील वचने: The Jews reprobated for intermarrying with

9 वचने · 46 पैलू

The Jews reprobated for intermarrying with बद्दल वचने

  1. या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.

  2. या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”

  3. जेव्हा मी हे ऐकले, तेव्हा मी माझा अंगरखा फाडला, डोक्याचे व दाढीचे केस उपटले आणि अत्यंत भयभीत मनस्थितीत मी खाली बसलो.

  4. याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता.

  5. त्यांची अर्धी मुलेबाळे अश्दोदी अथवा इतर लोकांची भाषा बोलत होती, पण त्यांना यहूदीयाची भाषा बोलता येत नसे.

  6. तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही.

  7. शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले.

  8. आता तुम्हीही तोच सर्व भयंकर दुष्टपणा करता व यहूदीतर स्त्रियांशी विवाह करून परमेश्वराशी विश्वासघात करीत आहात हे आम्ही ऐकावे काय?”

  9. मुख्य याजक एल्याशीबचा पुत्र यहोयादाच्या पुत्रांपैकी एकजण सनबल्लट होरोनी याचा जावई होता, म्हणून मी त्याला माझ्यापासून दूर हाकलून दिले.