मुख्य मजकुरावर जा

The Ammonites बद्दल बायबलमधील वचने: Punishment for oppressive cruelty

8 वचने · 46 पैलू

Punishment for oppressive cruelty बद्दल वचने

  1. अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

  2. याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.

  3. “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.

  4. तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

  5. तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.

  6. याहवेह असे म्हणतात, “अम्मोनच्या तीन नाही तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठी गिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले,

  7. म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील. महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावा तसा भयानक रणगर्जना होतील;

  8. आणि तिचा राजा आणि राजाचे अधिपती बरोबरच बंदिवासात जातील.” याहवेहने म्हटले.