Steadfastness बद्दल बायबलमधील वचने: Even under affliction
Even under affliction बद्दल वचने
आमच्यावर हे प्रसंग आले असताना आम्ही तुम्हाला विसरलो नाही; आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता.
आम्ही तुम्हाला सोडले नाही; तुमच्या मार्गातून आमचे पाय ढळले नाही.
पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले. तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे.
मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय?
कारण असे लिहिले आहे: “तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो, वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.”
नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत.
यासाठी तुमच्यामधील कोणीही या परीक्षांमुळे अस्थिर होऊ नये, कारण यासाठीच आपण नेमलेले आहोत हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे.