Skip to content

Stability of Character बद्दल बायबलमधील वचने

16 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.

  2. एक गीत. दावीदाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन.

  3. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

  4. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल.

  5. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल.

  6. याउलट काहीजण उत्तम जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात, स्वीकार करतात, पीक देतात—जे पेरले होते त्यापेक्षा तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देतात.”

  7. एखाद्या व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले, त्यावेळी ज्या स्थितीत ते होते तसेच त्यांनी राहवे.

  8. यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.

  9. बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा.

  10. परंतु प्रभू विश्वासू आहेत, ते तुम्हाला सामर्थ्यवान करतील आणि दुष्टापासून तुमचे रक्षण करतील,

  11. आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत.

  12. म्हणून कोणत्याही प्रकारच्या अनोळखी शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. जे खाऊन खाणार्‍याचा जीवनाला काहीच फायदा होत नाही असे विधिविषयक विशिष्ट पदार्थ खाण्याने नव्हे, तर तुमचे अंतःकरण कृपेने बळकट करणे चांगले आहे.

  13. कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्‍यासारखा आहे.

  14. तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो.

  15. परंतु जो कोणी स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांकडे लक्ष देतो आणि त्यामध्ये स्थिर राहतो, तो ऐकून विसरणारा न होता त्याप्रमाणे कृती करणारा होतो आणि तो जे काही करतो त्या गोष्टीत त्याला आशीर्वाद मिळतो.

  16. अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.”