Skip to content

Soldiers बद्दल बायबलमधील वचने

65 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर सेनाधिकारी आपल्या सैनिकांना म्हणतील: “तुम्हामध्ये असा कोणी आहे का, की ज्याने नुकतेच नवीन घर बांधले असून, तो अद्याप त्या घरात राहिला नाही? तर त्याने घरी जावे, कारण या युद्धात तो कदाचित मारला गेला तर दुसरा कोणीतरी त्या घरात राहू लागेल.

  2. तुम्हापैकी असा कोणी आहे, ज्याने द्राक्षमळा लावला, पण त्याचे फळ अद्याप खाल्लेले नाही? तर त्याने घरी जावे. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी त्याचा आनंद घेईन.

  3. तुमच्यापैकी कोणाचा वाङ्निश्चय झालेला असून त्याचा अद्याप विवाह झाला नाही असा आहे का? त्याने घरी जावे आणि विवाह करावा. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी तिच्याशी विवाह करेल.”

  4. मग सेनाधिकारी पुढे म्हणेल, “तुम्हापैकी कोणी भेकड वा भित्रा आहे का? जर असेल, तर इतर सैनिकांना घाबरवून टाकण्यापूर्वी त्याने घरी निघून जावे.”

  5. जेव्हा सेनाधिकारी आपले बोलणे संपवतील, ते सैनिकांवर सेनापती नियुक्त करतील.

  6. नुकतेच विवाह झालेल्या पुरुषाला सैन्याबरोबर मोहिमेवर पाठवू नये किंवा त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी टाकू नये. त्याला वर्षभर घरी राहण्याची मोकळीक असावी आणि त्याने घरी राहून आपल्या विवाहित पत्नीला आनंदित करावे.

  7. आता सैन्यांना सूचना दे, ‘जर कोणी घाबरत असतील, तर त्यांनी गिलआद डोंगरावरून माघारी जावे.’ ” त्यामधून बावीस हजार लोक परत गेले व दहा हजार राहिले.

  8. आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.”

  9. ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत सनोवरचे भाले परजलेले आहेत.

  10. मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले

  11. तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्यांना किरमिजी रंगाचा झगा घातला.

  12. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”

  13. ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले.

  14. येशूंची अशी थट्टा केल्यावर त्यांनी झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता घेऊन गेले.

  15. ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.

  16. मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”.

  17. त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही.

  18. येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.

  19. मग क्रूसावर टांगलेल्या येशूंवर पहारा करीत ते जवळच बसले.

  20. त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते: हा येशू, यहूद्यांचा राजा आहे.

  21. पिलाताने उत्तर दिले, “सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा.”

  22. त्या स्त्रिया वाटेवर असताना, काही शिपाई महायाजकाकडे गेले आणि काय घडले यासंबंधीचा सर्व वृतांत त्यांनी महायाजकांना सांगितला.

  23. यहूदी पुढार्‍यांची सभा बोलाविण्यात आली. त्या सभेत शिपायांना लाच देऊन,

  24. त्यांना असे सांगावयास लावले, “रात्री आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी येऊन त्यांचे शरीर पळवून नेले.

  25. राज्यपालांना हे समजले तर भिण्याचे काही कारण नाही. आम्ही तुमच्यावतीने बोलू. सर्वकाही ठीक होईल.”