Seventy बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मग याहवेहने मोशेला म्हटले, “तू आणि अहरोन, नादाब आणि अबीहू व इस्राएलींचे सत्तर वडील याहवेहकडे वर या. तुम्ही दुरूनच उपासना करावी,
मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले.
याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे.
मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले.
मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.
“तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’ निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा.
यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर शिष्य नेमले आणि त्यांना दोघे दोघे ज्या गावात व ठिकाणात ते जाणार होते तिथे त्यांना आपल्यापुढे पाठविले.
त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
जा, कोकरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे.
पैसे किंवा झोळी किंवा पायतण घेऊ नका आणि रस्त्यात कोणाला सलाम करू नका.
“ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, प्रथम, ‘या घरास शांती लाभो’ असे म्हणा.
जर एखादी शांतिप्रिय व्यक्ती तिथे असेल तर तुमची शांती त्यांच्यावर राहील; नसेल तर ती तुम्हाकडे परत येईल.
घरोघरी न जाता तिथेच राहा आणि तुम्हाला जे देण्यात येईल, ते खा व प्या. कारण कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे.
“एखाद्या गावाने तुमचे स्वागत केले, तर तिथे तुमच्यापुढे जे वाढण्यात येईल ते खा,
आजार्यांस बरे करा आणि त्यांना सांगा, ‘परमेश्वराचे राज्य आता तुमच्याजवळ आले आहे.’
पण जेव्हा तुम्ही एखाद्या गावात प्रवेश करता आणि त्यांनी तुम्हाला स्वीकारले नाही, तर त्यांच्या रस्त्यांवर जाऊन सांगा,
‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावाची धूळ इशारा म्हणून झटकून टाकतो. परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे, याची खात्री बाळगा.’
मी तुम्हाला सांगतो, तो दिवस या नगरांपेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.
“खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर ते गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप करीत बसले असते.
परंतु न्यायाच्या वेळी ते तुमच्यापेक्षा सोर व सीदोन यांना ते अधिक सुसह्य असेल
हे कफर्णहूमा, तू स्वर्गात घेतला जाशील काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील.
“जे तुमचे ऐकतात, ते माझे ऐकतात आणि जे तुम्हाला नाकारतात, ते मला नाकारतात. परंतु जे मला नाकारतात, ते ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना नाकारतात.”
नंतर ते बाहत्तर आनंदाने परतले आले आणि म्हणाले, “प्रभूजी, तुमच्या नावाने भुतेदेखील वश होतात.”