मुख्य मजकुरावर जा

Seventy बद्दल बायबलमधील वचने: The senate of the Israelites composed of seventy elders

5 वचने · 3 पैलू

The senate of the Israelites composed of seventy elders बद्दल वचने

  1. मग याहवेहने मोशेला म्हटले, “तू आणि अहरोन, नादाब आणि अबीहू व इस्राएलींचे सत्तर वडील याहवेहकडे वर या. तुम्ही दुरूनच उपासना करावी,

  2. मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले.

  3. याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे.

  4. मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले.

  5. मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.