Skip to content

Ruth बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.”

  2. तेव्हा ती म्हणाली, “हे स्वामी, तुमच्याकडून माझ्यावर सतत कृपा होत रहावी, जरी मी तुमच्या एखाद्या नोकरांपैकी नाही तरी तुमच्या या दासीबरोबर दयाळूपणाने बोलण्याने मला समाधान झाले आहे.”

  3. भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते.

  4. जेव्हा ती उरलेले धान्य जमा करण्यास उठली, तेव्हा बवाजाने त्याच्या माणसांना आज्ञा दिल्या, “तिला पेंढ्यांमधून राहिलेले धान्य गोळा करू द्या आणि तिला मनाई करू नका.

  5. उलट पेंढ्यांतून काही ताटे ओढून तिला वेचण्यासाठी पडू द्या, आणि तिला धमकावू नका.”

  6. अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा भरले.

  7. एके दिवशी रूथची सासू नाओमी तिला म्हणाली, “माझ्या मुली, जिथे तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल असे घर मला तुझ्यासाठी शोधलेच पाहिजे.

  8. ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल.

  9. आंघोळ कर, सुगंधी अत्तर लाव आणि तुझी उत्तम वस्त्रे घाल. नंतर खाली खळ्यात जा, परंतु त्याचे खाणे आणि पिणे होईपर्यंत त्याला माहीत होऊ देऊ नकोस की, तू तिथे आहेस.

  10. जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा तो कुठे झोपत आहे, हे पाहून ठेव. नंतर जा आणि त्याच्या पायांवरील पांघरूण काढ आणि तिथेच पडून राहा. काय करावयाचे तोच तुला सांगेल.”

  11. रूथने उत्तर दिले, “तुम्ही जे काही सांगता ते मी करेन.”

  12. तेव्हा ती खाली खळ्यात गेली आणि तिच्या सासूने जे सर्वकाही तिला करावयास सांगितले होते तसे तिने केले.

  13. जेव्हा बवाजने खाणे आणि पिणे संपविले आणि तो आनंदात होता, मग तो झोपण्यासाठी धान्य रचून ठेवलेल्या ढिगाऱ्यांच्या शेवटी गेला. रूथ शांतपणे त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या पायांवरचे पांघरूण काढले आणि तिथेच पडून राहिली.

  14. मध्यरात्री त्या मनुष्याला कशाचातरी धक्का लागला; त्याने वळून पाहिले—आणि त्याच्या पायाजवळ एक स्त्री निजली होती!

  15. त्याने विचारले, “तू कोण आहेस?” “मी तुमची दासी रूथ आहे. तुमच्या वस्त्राचा कोपरा माझ्यावर पसरून टाका, कारण तुम्ही आमच्या कुटुंबाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहात.”

  16. तो असेही म्हणाला, “तू घातलेली ओढणी माझ्याकडे आण आणि ती उघडून धरून ठेव.” जेव्हा तिने तसे केले तेव्हा त्याने सहा मापे भरून जव त्यावर ओतले आणि ते गाठोडे बांधून तिच्या खांद्यावर दिले. नंतर तो परत नगराकडे निघून गेला.

  17. तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे.

  18. मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!”

  19. तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.

  20. या तरुण स्त्रीपासून याहवेह तुला संतती देवो, तुझे कुटुंब तामार आणि यहूदाहचा पुत्र पेरेससारखे होवो.”

  21. तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला.

  22. सल्मोन हा बवाजचा पिता, बवाज हा ओबेदचा पिता,

  23. ओबेद हा इशायचा पिता, आणि इशाय हा दावीदाचा पिता.