Rest बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.
“सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्यावा; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात सुद्धा तुम्ही विसावा घ्यावा.
पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतीही नियमित कामे करू नये.
सात दिवस याहवेहसाठी अन्नार्पण द्यावे. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.’ ”
त्याच दिवशी तुम्ही एक पवित्र सभा भरवा आणि नियमित कामे करू नका. तुम्ही कुठेही राहिले तरी तुमच्या सर्व भावी पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ”
या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल.
जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन.
कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
पहिला दिवस हा पवित्र मेळावा आहे. कोणतेही नियमित काम या दिवशी करू नये.
सात दिवस याहवेहला अन्नार्पण करा आणि आठव्या दिवशी पवित्र मेळावा भरवून याहवेहला अन्नार्पण करा. हा मेळाव्याचा समारोप आहे; कोणतेही नियमित काम करू नका.
पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतेही नियमित कामे करू नये.
सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.
“ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका.
“ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे.
“ ‘याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक पवित्र सभा भरवा. तुम्ही स्वसुखाचा त्याग करावा व कोणतेही नियमित काम करू नये.
“ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र सभा बोलवा आणि त्या दिवशी कोणतीही नियमित कामे करू नये. हा सण तुम्ही याहवेहसाठी सात दिवस पाळावा.
“ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये.
येशूंनी आपल्या भोवताली जमलेली गर्दी पाहिली तेव्हा शिष्यांना आज्ञा करून ते म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.”
तेव्हा, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते.
माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.
नंतर येशूंनी सुचविले, “तुम्ही माझ्याबरोबर या, आपण शांत ठिकाणी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ.” कारण इतके लोक येजा करीत होते की, त्यांना जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही.
त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले.
प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील.
यास्तव, ज्याअर्थी त्यांच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या.