Reasoning बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?
तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो.
कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.
आजपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे वागत आला आहात, पण आता तसे करता येणार नाही,
पण मी सर्वसमर्थाशी बोलावे आणि माझा वाद परमेश्वरासमोर मांडावा असे मी इच्छितो.
मी जे सांगतो, ते लक्ष देऊन ऐका; माझे शब्द तुमच्या कानावर पडू द्या.
मी माझा वाद तयार केला आहे, मला माहीत आहे की मी दोषमुक्त ठरेन.
माझ्याविरुद्ध कोणी आरोप करेल काय? केलाच तर, मी शांत राहीन आणि मरून जाईन.
“हे परमेश्वरा, मला या दोन गोष्टी द्या, आणि मग मी तुमच्यापासून लपणार नाही:
माझ्यावरील आपला हात दूर करा, आणि तुमच्या धाकाने मला आणखी घाबरवू नका.
मला आवाज द्या आणि मी उत्तर देईन, किंवा मी बोलेन आणि तुम्ही मला उत्तर द्या.
मी किती चुका आणि पाप केलेत? माझे पाप आणि माझे अपराध मला दाखवा.
तुम्ही आपले मुख का लपविता आणि मला आपला शत्रू का मानता?
वार्याने उडून जाणार्या पानाला तुम्ही छळणार का? कोरड्या भुशाचा तुम्ही पाठलाग करणार का?
कारण माझ्याविरुद्ध तुम्ही कटुत्वाच्या गोष्टी लिहिता, आणि माझ्या तारुण्यातील पातकांची शिक्षा मला देता.
तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता; माझ्या पायांच्या तळव्यांना चिन्ह करून माझ्या सर्व मार्गावर तुम्ही लक्ष ठेवले आहे.
“सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे मनुष्य नष्ट होतो.
तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव; आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.
“या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.
“आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा.
माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?
भूतकाळाचे परीक्षण करा, चला, याबद्दल चर्चा करू या; तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा.
माझी बुद्धी मला परत लाभली. त्याचप्रमाणे माझा मान, वैभव आणि राज्य हेदेखील सर्व मला परत मिळाले. माझे मंत्री व अधिकारी माझ्याकडे परत आले, आणि मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मी पूर्वीपेक्षा अधिक महान झालो.
इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. या देशात राहणार्यांवर याहवेहचा आरोप आहे: या देशात विश्वासूपणा नाही, प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.