Skip to content

Reasoning बद्दल बायबलमधील वचने: God reasons with men

9 वचने · 8 पैलू

God reasons with men बद्दल वचने

  1. याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?

  2. तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो.

  3. कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.

  4. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.

  5. “आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा.

  6. माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?

  7. भूतकाळाचे परीक्षण करा, चला, याबद्दल चर्चा करू या; तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा.

  8. इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. या देशात राहणार्‍यांवर याहवेहचा आरोप आहे: या देशात विश्वासूपणा नाही, प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.

  9. “हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत.