- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Purifications बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत.
ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत.
त्या ठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लीटर पाणी मावत असे.
कोणाएका यहूदी मनुष्याने योहानाच्या शिष्यांबरोबर शुद्धीकरणाच्या विधीबद्दल वादविवाद केला.
तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही.
दुसर्या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला.
मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला.
जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे;
हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तिथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही.
हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.
परंतु जेव्हा चांगल्या गोष्टी ज्या आता येथे आहेत त्यांचा महायाजक म्हणून ख्रिस्त आले होते, जो मानवी हाताने केलेला नाही व जो या सृष्टीचा भाग नाही, अशा अधिक महान व अधिक परिपूर्ण मंडपाद्वारे आत गेले.
त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली.
जर शेळ्यांचे आणि बैलांचे रक्त किंवा कालवडींची राख विधिपूर्वक अशुद्ध असलेल्यांवर शिंपडल्यास ते बाह्यतः शुद्ध केले जाते.
जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले.
म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.
परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते.