Presents बद्दल बायबलमधील वचने: To reward service
To reward service बद्दल वचने
पण त्या मनुष्याने योआबाला उत्तर दिले, “जरी माझ्या हातावर चांदीची हजार शेकेल वजन करून ठेवली, तरी मी राजपुत्रावर हात टाकणार नाही. कारण राजाने तुला, अबीशाईला व इत्तयला आज्ञा देताना आम्ही असे ऐकले की, ‘माझ्यासाठी तरुण अबशालोमचे रक्षण करा.’
पण माझे स्वप्न काय होते, त्याचा अर्थ काय आहे, हे तुम्ही मला सांगितले, तर तुम्ही माझ्याकडून भेट व इनामे आणि मोठा सन्मान प्राप्त कराल. म्हणून मला माझे स्वप्न सांगा आणि त्या स्वप्नांचा अर्थ सांगा.”
मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.