मुख्य मजकुरावर जा

Presents बद्दल बायबलमधील वचने: Food

3 वचने · 37 पैलू

"Presents" साठी शोधा

Food बद्दल वचने

  1. नंतर त्यांचे वडील इस्राएल त्यांना म्हणाले, “जर असेच असेल तर मग हे करा: या देशात उत्पादन होणारे सर्वोत्तम पदार्थ—थोडे औषधी बलसान, थोडे मध, मसाले, गंधरस, पिस्ते व बदाम आपल्या गोण्यात घ्या आणि या वस्तू त्या मनुष्याला देणगी म्हणून घेऊन जा.

  2. तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले.

  3. तुझ्याबरोबर दहा भाकरी, काही वड्या आणि मधाची एक कुपी घेऊन त्याच्याकडे जा आणि मुलाचे काय होईल ते तो तुला सांगेल.”