Pardon बद्दल बायबलमधील वचने: For yourselves
For yourselves बद्दल वचने
याहवेह, आपल्या नावाच्या गौरवासाठी माझे अपराध क्षमा करा, कारण ते घोर आहेत.
माझे क्लेश आणि माझ्या वेदना पाहा आणि माझ्या सर्व पातकांची क्षमा करा.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा. परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.
आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा केली आहे, तशी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा करा.
कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ”