Pardon बद्दल बायबलमधील वचने: Mercy of God
Mercy of God बद्दल वचने
हजारांवर प्रीती करणारे, दुष्टता, अपराध व पाप यांची क्षमा करणारे; तरीही याहवेह दोषीला निर्दोष असे सोडत नाहीत; तर आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततीवर, व त्यांच्या संततीच्या तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत देणारे आहे.”
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा. परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.