Pardon बद्दल बायबलमधील वचने: To those who confess their sins
To those who confess their sins बद्दल वचने
नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस.
नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला
जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील.