मुख्य मजकुरावर जा

Justice बद्दल बायबलमधील वचने

47 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.”

  2. ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!” परंतु दुसरी म्हणाली, “तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!”

  3. तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”

  4. शलोमोनाची गीत रचना हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.

  5. तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो, तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.

  6. तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला

  7. दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.

  8. दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.

  9. मग मी सूर्याखाली आणखीही काही बघितले: दुष्टाईने—न्यायाचे स्थान घेतले होते. आणि न्यायीपणाच्या ठिकाणीसुद्धा—दुष्टताच होती.

  10. मी स्वतःला म्हटले, “परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट या दोघांचाही न्याय करणार, कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार, प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ.”

  11. म्हणून न्याय मागे सरला आहे, आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; सत्य रस्त्यावर अडखळले आहे, प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही.

  12. सत्य कुठेही शोधून सापडत नाही, आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो. याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले कारण न्याय्य कुठेही नाही.

  13. याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर:

  14. ‘दावीदाच्या राजासनावर बसलेल्या हे यहूदीयाच्या राजा, याहवेहचा हा संदेश तुझ्यासाठी आहे—तू, तुझे अधिकारी आणि लोक जे या व्दारातून आत येतात या सर्वांसाठी.

  15. याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.

  16. जर तुम्ही या आज्ञेचे काळजीपूर्वक पालन केले, नंतर दावीदाच्या राजासनावर बसलेले राजे या महालाच्या व्दारातून रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन, त्यांचे अधिकारी आणि लोक यांच्यासह प्रवेश करतील.

  17. परमोच्चांनी दिलेले हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणे,

  18. कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय?

  19. तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.

  20. कारण तुमचे अपराध किती अधिक आणि तुमची पातके किती घोर आहेत हे मला माहीत आहे. निरपराधांवर अत्याचार करून लाच घेतात व गरिबांना न्यायालयात न्याय मिळण्यापासून वंचित करतात असेही लोक आहेत.

  21. “यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत असाल आणि तिथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काहीतरी आहे,

  22. तर तुमची भेट तिथेच वेदीपुढे ठेवा. आधी जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा.