Skip to content

Justice बद्दल बायबलमधील वचने: General references

35 वचने · 36 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये.

  2. “दुष्कृत्य करण्याकरिता जमावाला अनुसरू नका आणि त्या जमावाशी एक होऊन न्यायवादात आपली साक्ष फिरवू नका,

  3. आणि गरिबाच्या न्यायवादात तो दोषी असता, त्यावर दया दाखवू नये.

  4. “तुमच्यातील गरिबांच्या न्यायवादात त्यांचा न्याय नाकारला जाऊ नये.

  5. खोट्या आरोपांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि निरपराधी किंवा प्रामाणिक व्यक्तीला मरणदंड देऊ नये, कारण मी दोषी व्यक्तीला सोडणार नाही.

  6. “तुम्ही लाच घेऊ नये, कारण लाच डोळस व्यक्तीस आंधळे करते व निरपराध्याचे शब्द विपरीत करते.

  7. “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.

  8. “ ‘तुम्ही बहिर्‍यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे.

  9. “ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्‍याचा योग्य न्याय करावा.

  10. याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.

  11. भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते.

  12. न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.

  13. लोकांमध्ये वाद उपस्थिती झाला आणि न्याय मागण्यासाठी त्यांनी न्यायालयात जावे व न्यायाधीशाने त्यांचा निवाडा करावा. जो निर्दोष असेल त्याला निर्दोषी ठरवावे व जो दोषी असेल त्याला दोषी ठरवावे.

  14. दोषी मनुष्य जर फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला, तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे आणि आपल्यादेखत त्याच्या अपराधाप्रमाणे मोजून फटके मारावेत,

  15. परंतु न्यायाधीशाने त्याला चाळीस पर्यंतच फटके मारावेत, अधिक फटके मारू नयेत. नाहीतर, अधिक फटके मारल्यास, तुमच्या बंधूंची तुमच्यादेखत अप्रतिष्ठा होईल.

  16. बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.

  17. शलोमोनाची गीत रचना हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.

  18. तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो, तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.

  19. तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला

  20. दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.

  21. दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.

  22. मग मी सूर्याखाली आणखीही काही बघितले: दुष्टाईने—न्यायाचे स्थान घेतले होते. आणि न्यायीपणाच्या ठिकाणीसुद्धा—दुष्टताच होती.

  23. मी स्वतःला म्हटले, “परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट या दोघांचाही न्याय करणार, कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार, प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ.”

  24. म्हणून न्याय मागे सरला आहे, आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; सत्य रस्त्यावर अडखळले आहे, प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही.

  25. सत्य कुठेही शोधून सापडत नाही, आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो. याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले कारण न्याय्य कुठेही नाही.