मुख्य मजकुरावर जा

Joab बद्दल बायबलमधील वचने: Numbers the people

10 वचने · 4 पैलू

Numbers the people बद्दल वचने

  1. तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; तेव्हा ते इस्राएलच्या लढाऊ पुरुषांची गणती करण्यासाठी राजापुढून निघून गेले.

  2. यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्‍यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले.

  3. नंतर ते गिलआद व तहतीम होदशी या प्रांतात गेले व तिथून दान यअनकडून वळसा घेऊन सीदोनकडे गेले.

  4. नंतर ते सोरच्या किल्ल्याकडे आणि हिव्वी व कनानी यांच्या सर्व नगरांकडे व शेवटी ते यहूदीयाच्या नेगेवप्रांतातील बेअर-शेबापर्यंत गेले.

  5. नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले.

  6. योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.

  7. तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला.

  8. योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते.

  9. दावीदाने शिरगणती केली, तेव्हा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा त्या गणतीमध्ये समावेश केला नव्हता, कारण याहवेहने इस्राएली लोकांची संख्या आकाशातील ताऱ्यांसारखी अगणित करण्याचे वचन दिले होते.

  10. जेरुइयाहचा पुत्र योआबाने गणती सुरू केली, परंतु तो ती पूर्ण करू शकला नाही. कारण इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि गणतीची पूर्ण संख्या दावीद राजाच्या इतिहासात लिहिली गेली नाही.