Skip to content

Industry बद्दल बायबलमधील वचने

46 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्‍यांना कमरबंद पुरविते.

  2. बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.

  3. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.

  4. घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.

  5. तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:

  6. “उत्कृष्ट कार्य करणार्‍या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.”

  7. मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.

  8. तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.

  9. माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.

  10. तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.

  11. म्हणून आता मला जीवनाचा वीट आला आहे, कारण सूर्याखाली जे काही केले जात आहे, ते मला दुःख देणारे आहे. ते सर्वकाही व्यर्थ, वार्‍यामागे धावण्यासारखे आहे.

  12. या सूर्याखाली मी ज्याच्यासाठी कष्ट केले, त्या सर्वाचा मला द्वेष वाटू लागला, कारण जे लोक माझ्यानंतर येणार त्यांच्यासाठी ते मला सोडून द्यावे लागणार.

  13. कोणाला माहीत की तो व्यक्ती सुज्ञ असेल वा मूर्ख? तरीही सूर्याखाली ज्यामध्ये मी माझे प्रयत्न आणि कौशल्य ओतले, त्या माझ्या या कष्टाच्या प्रतिफळांचा ताबा त्यांच्याकडे असेल. हे सुद्धा व्यर्थच आहे.

  14. म्हणून या सूर्याखाली केलेल्या माझ्या सर्व श्रमाबद्दल माझे हृदय निराश होऊ लागले.

  15. कारण एखादी व्यक्ती सुज्ञान, विद्या आणि कौशल्य यांच्या साहाय्याने कष्ट करते आणि ते अशा व्यक्तीच्या हाती सोडते, की ज्याने त्यासाठी काहीही श्रम केलेले नाहीत. हे सुद्धा निरर्थक आणि मोठ्या दुर्भाग्याचे आहेत.

  16. सूर्याखाली त्या लोकांचे सर्व कष्ट, ज्यासाठी त्यांनी मनापासून परिश्रम केले त्याचे त्यांना काय मिळणार?

  17. शांतीने जीवन जगणे, आपल्या व्यवसायात मग्न असणे आणि स्वतःच्या हाताने काम करणे हे तुमचे ध्येय असू द्या,

  18. म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

  19. आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.”

  20. तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो.

  21. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावे.