Skip to content

Industry बद्दल बायबलमधील वचने

46 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो!

  2. तिला कोणीही अधिकारी, मुकादम किंवा अधिपती नाही,

  3. तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते.

  4. आळशी हात दरिद्री आणतो, परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो.

  5. जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय; परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो.

  6. आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा, तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या;

  7. कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही, आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो.

  8. वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते,

  9. तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील, आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील.

  10. तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी तुझ्याकडे शेळ्यांचे पुष्कळ दूध असेल.

  11. मुंग्या, दुर्बल प्राणी आहेत, तरीही उन्हाळ्यात ते त्यांचे धान्य साठवून ठेवतात;

  12. खडकातील ससे अगदी नाजूक प्राणी! तरी ते खडकात स्वतःचे घर बनवतात;

  13. टोळांना त्यांचा राजा नसतो, तरी ते टोळीटोळीने एकत्र पुढे चाल करतात;

  14. पाल, त्यांना हाताने पकडणे शक्य आहे, तरीपण त्या राजांच्या महालात सापडतात.

  15. ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते.

  16. ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.

  17. ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.

  18. ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.

  19. ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.

  20. तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.

  21. ती तिच्या हातांमध्‍ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते.

  22. ती गरिबांना उदारहस्ते देते आणि गरजूंना सढळ हाताने देते.

  23. हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात.

  24. ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते.

  25. तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो.